पुस्तकनिष्ठांची मांदियाळी
मला या खेळात सामील करून घेतल्याबद्दल मिलिंदचे आभार. खेळाविषयी अधिक माहिती करता हे पहा : काहीशी माहीती माझ्याबद्दल: वाचनाची भरपूर आवड - होती.. काही वर्षापूर्वीपर्यंत. पण आता कार्यबाहुल्यामुळे फारसा वेळ दिला जात नाही वाचनाकडे (परत वाचनाकडे वळण्याचा प्रयत्न मनापासून चालू आहे). तर प्रस्तावनेचे कारण म्हणजे मी नविन पुस्तके वाचलेली नसल्याने जुन्या पुस्तकांबद्दलच बोलणार आहे. १. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक: सखी - व.पु. काळे २. वाचले असल्यास त्याबद्दल थोडी माहिती. वपुंचा एक अप्रतिम कथासंग्रह. अगणितवेळा वाचून झाले आहे आणि अजूनही परत वाचावेसे वाटते आहे. सखी, झोका, गार्गी, बाप सगळ्याच कथा उत्तम आहे. डोक्यात पक्की बसलेली गोष्ट म्हणजे - सखी. आस्तिक आणि नास्तिक याची इतकी सोपी व्याख्या मी प्रथमच वाचली. आस्तिक म्हणजे तो सगळ्या गोष्टींना होकार देतो तो आणि नास्तिक म्हणजे जो सतत नकारघंटा वाजवतो. अप्रतिम! ३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी/(इतक्यात वाचलेली) ५ पुस्तके. सखी - व.पु. दुनियादारी - सु. शि. रक्तरेखा - प्रदीप दळवी राजाशिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदर