Posts

Showing posts with the label Marathi

Balak Palak (Marathi Movie)

Image
Yesterday Zee Marathi aired one of the recent movies in Marathi - BP (Balak - Palak) . I had heard a lot about the movie and also had planned to watch it in theater, but somehow I couldn't. So when I get to know the timing, I blocked my calendar and also ensured that Mrunmay doesn't disturb in between :p The theme is very different from the movies that we have seen so far and very happy for the BP team to take up such a subject. It is about the children with their unending curiosity for everything including sex and some of the side effects of it. You can read more about the storyline and other things at imdb and other sites . What I liked about the movie: All the kids (not kids really) - Avya, Bhagya, Chiu, Dolly and Vishu. Very good performance by each one of them. Kadam kaka by Kishor Kadam Song selection when the kids were trying to peeping through the window - That one is too hilarious!! The emotional disturbance after the kids watch the BP aka "Dhinch...

शतकोत्तर रौप्यमहोत्सव!!

माझी नूमवि.. नूतन मराठी विद्यालय... १२५ वर्षांची झाली. १ जानेवारी माझ्या शाळेचा वाढदिवस. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एका नवीन अध्यायाची सुरुवात केली. इंग्रजी राज्याच्या काळात मराठी शाळेची गरज ओळखून आपल्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने शाळेच्या कार्यास सुरुवात झाली. गेल्या १२५ वर्षांच्या काळात माझ्यासारखे लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडले.. नुसते शिकून नाही तर सुसंस्कृत होवून. शाळेला लाभलेल्या एकाहून एक महान शिक्षकामुळेच अनेक महान विद्यार्थी पण तयार झाले. जसे की - रॅंग्लर र. पु. परांजपे, माजी सरन्यायाधीश श्री. चंद्रचूड, वि.स. घाटे इ. माझ्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या शालामातेस त्रिवार वंदन करून या वर्षातील ब्लॉगींगला सुरुवात करतो!! http://www.numavi.com (अजून बाल्यावस्थेत आहे) http://www.numavi125.org/index.php

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

सरत्या वर्षाने दिलेले दुःख विसरून, मिळालेल्या सुखाच्या आठवणी बरोबर घेऊन, जुनी नात्यांची हिरवाई जपत, नवीन नात्यांची पालवी घेवून, पूर्ण न झालेले संकल्प या वर्षी पूर्ण होण्याची मनीषा बाळगत नवीन वर्षात प्रवेश करू यात. .हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, समृद्धीचे आणि शांततेचे जावो हिच सदिच्छा!! ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

complacency or माज?

गेल्या काही दिवसांपासून मी एका "home theatre"च्या शोधात आहे. आपसूकच माझे लक्ष "सोनी" कंपनीच्या उत्पादनाकडे गेले. मी त्यांच्या कोथरुडच्या दुकानाला भेट द्यायचे ठरवले आणि एका संध्याकाळी तिथे जावून थडकलो. एका प्रतिनिधीने स्वागत वगैरे केले. प्र.: "वेलकम सर. व्हॉट कॅन आय डू फ़ॉर यू?" मी: "होम थिएटर बघायचे आहे." प्र.: "कम धिस वे सर". प्र.: "हॅव अ सिट सर". मग आम्ही तिथल्या सोफ्यात स्थानापन्न झालो. समोरच दूरदर्शन संच, DVD player, ध्वनिवर्धक संच होते. ३ ध्वनिवर्धक पुढे आणि २ आमच्या सोफ्यापाशी. प्र.: "सर धिस इज अ ५.१ चॅनेल सिस्टीम. २ फ्रंट स्पीकर्स, २ रेअर स्पीकर्स, १ वूफर" त्यानंतर त्याने एक DVD चालू केली - डेमो. एका खोलीचे चित्र. त्यात स्पीकर्स दाखवलेले. आणि एक हेलिकॉप्टर वर घिरट्या घालत होते. ते चित्रात ज्या भागात फिरेल त्या भागातील स्पीकरमधून आवाज येत होता. कानाला खूप छान वाटले. दोन घिरट्यांनंतर प्रतिनिधीने DVD थांबवली आणि आमच्याकडे बघू लागला. आम्ही विचार करतो आहोत की हा पुढे काहीतरी बोलेल, अजून काहीतरी दाखवेल - नाही. शेवटी ...

जादू की झप्पी

मुन्नाभाई MBBS ने एक गोष्ट नक्की शिकवली आहे आपल्याला - 'जादू की झप्पी'. एक आलिंगन, एक मिठी काय चमत्कार करू शकते हे आपण बर्‍याच वेळा अनुभवलेले आहेच. आश्चर्याची गोष्ट अशी कि ऑस्ट्रेलियात अशी एक व्यक्ती खरंच आहे. त्या व्यक्तीने "मुक्त आलिंगन" अशी चळवळच चालू केलेली आहे. अधिक माहीतीसाठी वाचा: http://www.freehugscampaign.org/ मुन्नाभाई MBBS याच्यावरूनच बनवला होता काय?

अति घाई...

सध्या सत्ताधारी पक्षाला 'जलद बस सेवे'चे श्रेय पदरात पाडून घेण्यापलीकडे काहिच दिसत नाही आहे. 'BRT' सेवा अपूर्णावस्थेत चालू करून त्यांनी आपली टिमकी वाजवलीच आहे. परंतु आता त्याच्यामुळे होणार्‍या अपघाताची जबाबदारी कोण घेणार आहे? काल रात्री 'BRT' च्या मार्गावरून भरधाव जाणार्‍या 'PMT' ने एका तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. 'BRT' साठी वेगळा मार्ग असल्याने त्या वेगात जाणारच, परंतु, त्या मार्गावरुन 'PMT'ने जाऊ नये अशीच माफक अपेक्षा आहे. 'BRT' साठीचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्याशिवाय बस सेवा सुरु करायलाच नको होती. कुठलीही योजना चालू करणे सोपे असते, परंतु त्याची बरोबर आणि योग्य अंमलबजावणीसाठी संयम आणि नियोजन लागते, ते सत्ताधार्‍यांकडे आहे का? Ref: http://esakal.com/esakal/12052006/FA9D2F32D9.htm

उमेद

त्या गुलाबी वळणावरती भेटलास, आयुष्यभर साथ देईन म्हणालास, गोड स्वप्नांत गुंतले मी, तुझ्यासवे स्वर्गात पोहोचले मी. मधुचंद्राची गोडी, तुझी नी माझी जोडी, दॄष्ट लागली कोणाचीतरी, काढली कोणीतरी खोडी, तो काळा दिवस आयुष्यातला, पण कोणास ठाऊक होते, संध्याकाळच्या कातरवेळेस, माझे नशीबच बदलणार होते ऑफिसचा पहिलाच दिवस, तुझी वाट बघण्याची मजा, ह्रुदयात अनामिक हुरहुर, एका बातमीत झाली सजा बॉम्बच्या एका फटक्यात, उधळून गेला सगळा डाव, सव्वीस दिवसांचा संसार, उरला फक्त काळजात घाव तुझ्या आठवणींचाच आधार आता, जगण्याची उमेद देईल मला, देवा, पुढच्या जन्मी मात्र, त्यांच्या आधी नेशील मला!! जरुर वाचा: Married for only 26 days - 187 Mumbai Life Stories

आळस

रोज काहीतरी लिहावे म्हणतो, पण सुचत नाही काही, चहावर चहा रिचवला तरी, कागदावर काही उतरत नाही. वाटते जगाला सांगावे की, मी पण कविता करू शकतो, 'ट' ला 'ट'च काय, पण, 'प्राची' ला 'गच्ची' पण जुळवू शकतो वाटते कधी मला कि लिहावी एक छानशी कथा, सुरुवात करायच्या आधीच, विसरून जातो सगळी गाथा शेवटी वैतागून म्हणतो, आता कशाला हवी कथा आणि कादंबरी, लिहायचे कष्ट उगाचच, जेव्हा असता दासबोध आणि ज्ञानेश्वरी