अति घाई...

सध्या सत्ताधारी पक्षाला 'जलद बस सेवे'चे श्रेय पदरात पाडून घेण्यापलीकडे काहिच दिसत नाही आहे. 'BRT' सेवा अपूर्णावस्थेत चालू करून त्यांनी आपली टिमकी वाजवलीच आहे. परंतु आता त्याच्यामुळे होणार्‍या अपघाताची जबाबदारी कोण घेणार आहे?

काल रात्री 'BRT' च्या मार्गावरून भरधाव जाणार्‍या 'PMT' ने एका तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. 'BRT' साठी वेगळा मार्ग असल्याने त्या वेगात जाणारच, परंतु, त्या मार्गावरुन 'PMT'ने जाऊ नये अशीच माफक अपेक्षा आहे. 'BRT' साठीचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्याशिवाय बस सेवा सुरु करायलाच नको होती.

कुठलीही योजना चालू करणे सोपे असते, परंतु त्याची बरोबर आणि योग्य अंमलबजावणीसाठी संयम आणि नियोजन लागते, ते सत्ताधार्‍यांकडे आहे का?

Ref: http://esakal.com/esakal/12052006/FA9D2F32D9.htm

Comments

Popular posts from this blog

What is "B A Y"?

Subscription Services

Music Musings