उमेद
त्या गुलाबी वळणावरती भेटलास, आयुष्यभर साथ देईन म्हणालास, गोड स्वप्नांत गुंतले मी, तुझ्यासवे स्वर्गात पोहोचले मी. मधुचंद्राची गोडी, तुझी नी माझी जोडी, दॄष्ट लागली कोणाचीतरी, काढली कोणीतरी खोडी, तो काळा दिवस आयुष्यातला, पण कोणास ठाऊक होते, संध्याकाळच्या कातरवेळेस, माझे नशीबच बदलणार होते ऑफिसचा पहिलाच दिवस, तुझी वाट बघण्याची मजा, ह्रुदयात अनामिक हुरहुर, एका बातमीत झाली सजा बॉम्बच्या एका फटक्यात, उधळून गेला सगळा डाव, सव्वीस दिवसांचा संसार, उरला फक्त काळजात घाव तुझ्या आठवणींचाच आधार आता, जगण्याची उमेद देईल मला, देवा, पुढच्या जन्मी मात्र, त्यांच्या आधी नेशील मला!! जरुर वाचा: Married for only 26 days - 187 Mumbai Life Stories