शतकोत्तर रौप्यमहोत्सव!!

माझी नूमवि.. नूतन मराठी विद्यालय... १२५ वर्षांची झाली. १ जानेवारी माझ्या शाळेचा वाढदिवस. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एका नवीन अध्यायाची सुरुवात केली. इंग्रजी राज्याच्या काळात मराठी शाळेची गरज ओळखून आपल्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने शाळेच्या कार्यास सुरुवात झाली. गेल्या १२५ वर्षांच्या काळात माझ्यासारखे लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडले.. नुसते शिकून नाही तर सुसंस्कृत होवून. शाळेला लाभलेल्या एकाहून एक महान शिक्षकामुळेच अनेक महान विद्यार्थी पण तयार झाले. जसे की - रॅंग्लर र. पु. परांजपे, माजी सरन्यायाधीश श्री. चंद्रचूड, वि.स. घाटे इ.

माझ्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या शालामातेस त्रिवार वंदन करून या वर्षातील ब्लॉगींगला सुरुवात करतो!!

http://www.numavi.com (अजून बाल्यावस्थेत आहे)
http://www.numavi125.org/index.php

Comments

Popular posts from this blog

Subscription Services

Movie Review: Chhota Bheem and The Throne of Bali

Entering thirties....