complacency or माज?

गेल्या काही दिवसांपासून मी एका "home theatre"च्या शोधात आहे. आपसूकच माझे लक्ष "सोनी" कंपनीच्या उत्पादनाकडे गेले. मी त्यांच्या कोथरुडच्या दुकानाला भेट द्यायचे ठरवले आणि एका संध्याकाळी तिथे जावून थडकलो. एका प्रतिनिधीने स्वागत वगैरे केले.
प्र.: "वेलकम सर. व्हॉट कॅन आय डू फ़ॉर यू?"
मी: "होम थिएटर बघायचे आहे."
प्र.: "कम धिस वे सर".
प्र.: "हॅव अ सिट सर".
मग आम्ही तिथल्या सोफ्यात स्थानापन्न झालो. समोरच दूरदर्शन संच, DVD player, ध्वनिवर्धक संच होते. ३ ध्वनिवर्धक पुढे आणि २ आमच्या सोफ्यापाशी.
प्र.: "सर धिस इज अ ५.१ चॅनेल सिस्टीम. २ फ्रंट स्पीकर्स, २ रेअर स्पीकर्स, १ वूफर"
त्यानंतर त्याने एक DVD चालू केली - डेमो. एका खोलीचे चित्र. त्यात स्पीकर्स दाखवलेले. आणि एक हेलिकॉप्टर वर घिरट्या घालत होते. ते चित्रात ज्या भागात फिरेल त्या भागातील स्पीकरमधून आवाज येत होता. कानाला खूप छान वाटले. दोन घिरट्यांनंतर प्रतिनिधीने DVD थांबवली आणि आमच्याकडे बघू लागला. आम्ही विचार करतो आहोत की हा पुढे काहीतरी बोलेल, अजून काहीतरी दाखवेल - नाही. शेवटी मी विचारले - "काय झाले".
प्र.: "दॅट्स ऑल सर".
मी: "एव्हढाच डेमो?"
प्र.: "हो सर".
मी: "जरा चित्रपटाची DVD लावून दाखवाना. कसे ऐकू येते आहे ते कळेल."
प्र.: "सर DVD नाही आहे".

आम्ही अचंबित. सोनी सारख्या प्रतिष्ठीत कंपनीच्या दुकानात फक्त डेमो DVD, बाकी काहिच नाही दाखवायला... परत त्या माणसाने कुठल्याही प्रकारे ते उत्पादन आम्हाला विकायचा प्रयत्न केला नाही. 'तुम्हाला बघायचे होते, मी दाखवले. तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही सांगालच. मी कशाला विकायचा प्रयत्न करू....' वगैरे वगैरे भाव त्यातून व्यक्त होत होते.

शेवटी वैतागून आम्ही बाहेर पडलो. विचार केला, कोथरुडचे दुकान चांगले नसेल. औंधला जावू. तिथे पण जवळ जवळ तसाच अनुभव. पण कमीत कमी तिथल्या प्रतिनिधीने एक DVD तरी लावून दाखवली.

तिथेच जवळच 'सॅमसंग'चे दुकान होते. तिथे मात्र बराच चांगला अनुभव आला. त्या दुकानात एक स्वतंत्र खोलीच केलेली होती 'home theatre'च्या डेमोसाठी. त्यामुळे बाकी कुठल्याही आवाजाचा त्रास नको. परत, त्यांनी त्यांच्याकडची सगळी मॉडेल्स तिथे जोडून ठेवलेली होती. ग्राहकाला जे मॉडेल बघायचे असेल ते टि.व्ही. ला जोडले की डेमो चालू. त्याच्याकडे पण DVD नव्हती. पण यावेळेस मी माझी स्वतःची DVD घेऊन गेलो होतो :) तिथल्या प्रतिनिधीने छान डेमो दिला. परत नंतर निघताना विचारले कधीपर्यंत ठरेल, माझा भ्रमण्ध्वनी क्रमांक वगैरे घेतला.

हे सगळे झाल्यावर दोन्हीची 'सोनी' आणि 'सॅमसंग' ची तुलना अपरिहार्यच होती. 'सोनी' चे आवाजाच्या क्षेत्रात दबदबा असेल, पण ग्राहकानुभवाच्या बाबतीत मी त्यांना शून्य गुण देईन. ग्राहकाला नक्की काय पाहीजे याचा विचार सेवाक्षेत्रात होत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. याला "complacency" म्हणावी की माज म्हणावा?

Comments

Popular posts from this blog

Subscription Services

Movie Review: Chhota Bheem and The Throne of Bali

Entering thirties....