आळस

रोज काहीतरी लिहावे म्हणतो, पण सुचत नाही काही,
चहावर चहा रिचवला तरी, कागदावर काही उतरत नाही.

वाटते जगाला सांगावे की, मी पण कविता करू शकतो,
'ट' ला 'ट'च काय, पण, 'प्राची' ला 'गच्ची' पण जुळवू शकतो

वाटते कधी मला कि लिहावी एक छानशी कथा,
सुरुवात करायच्या आधीच, विसरून जातो सगळी गाथा

शेवटी वैतागून म्हणतो, आता कशाला हवी कथा आणि कादंबरी,
लिहायचे कष्ट उगाचच, जेव्हा असता दासबोध आणि ज्ञानेश्वरी

Comments

Nandan said…
:). Kavitaa mast aahe, aataa kathechi vaaT paahatoy :).

Popular posts from this blog

Subscription Services

Movie Review: Chhota Bheem and The Throne of Bali

Telemarketing